Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीकोण ठरणार'बिग बॉस मराठी सिझन ३' चा महाविजेता ?

कोण ठरणार’बिग बॉस मराठी सिझन ३’ चा महाविजेता ?

 "Grand Finale "ची उत्सुकता शिगेला

मुंबई : शंबर दिवसांनी दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी सजलं आणि महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाला. या प्रवासाची सुरूवात झाली १५ सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले TOP ५ सदस्य म्हणजेच विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा.

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली. या १०० दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या या घराला घरपण आलं. पण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही.

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या ‘TOP ५’ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. तेव्हा नक्की बघा ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ चा धम्माकेदार ‘Grand Finale’ २६ डिसेंबर रोजी संध्या ७.०० पासून फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -