मुस्लिम समाजासाठी अंत्यविधीकरिता दफनभूमीच नाही

कुणाल म्हात्रे


कल्याण : कल्याण-डोंबिवली अ प्रभाग क्षेत्रात राहत असणाऱ्या मुस्लिम समाजासाठी मृतांना दफन करण्यासाठी पालिकेची अधिकृत दफनभूमी नसल्याचे उघड झाले आहे.

महापालिका क्षेत्रात भूखंडावर आरक्षण टाकून प्रशासनाने प्रत्यक्षात कागदोपत्री ताबा न घेता भूमाफियांनी मोकळ्या आरक्षित जागेवर टॉवर्स उभे करण्याचे धाडस दाखविले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागात '१० वॉर्ड' येत असून किमान २० हजारांच्या आसपास मुस्लिम समाज वास्तव करीत आहे. वडवली, अटाळी, मोहने शहरातील विविध विभाग तसेच बल्याणी, आंबिवली आदी भागात विखुरलेला मुस्लिम समाज राहत असून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनभूमी नसल्याने मृतदेहाला ट्रक किंवा टेम्पोमध्ये दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये घेऊन जावे लागते. नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही खर्चिक बाब असून अनेकदा ट्राफिकमध्ये दफनभूमीत पोहोचण्यासाठी दमछाक होते.

मोहने विभागातील जामा मस्जिदच्या ट्रस्टींनी अनेकदा पालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, खासदार, आमदार तसेच राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महसूल मंत्री आदींकडे निवेदन देऊनही दफनभूमीबाबत पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला सर्वच प्रकारचा कर भरूनही पालिका प्रशासनाने दफनभूमीबाबत उदासीनतेची भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप जामा मस्जिदचे आयुब खान यांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे नगररचनाकार रघुवीर शेळके यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केले नसल्याचे सांगितले आहे.
Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी