Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली

राज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली

रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने

मुंबई : महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनंतर ही नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Night Curfew in Maharashtra) यासंदर्भात अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.

राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज २४ रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार

पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी; फटाके फोडता येणार नाहीत, आतिषबाजी नाही

लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध; १०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती

कार्यक्रम कोणताही असो १०० लोकांनाच परवानगी

बंदीस्त जागेतील कार्यक्रम, समारंभ, लग्न, इतर कार्यक्रम याकरता २५ टक्के लोकांनाच किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

खुल्या जागेतील कार्यक्रमात ५० टक्के किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

रेस्टरंट ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार, पण प्रशासनाचे आता हॉटेल, रेस्टॉरंटकडे बारकाईने लक्ष असेल

महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा कोरोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल.

या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यात नाइट कर्फ्यू तसेच स्थानिक पातळीवर गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जावेत, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने लगेचच निर्णय घेत राज्यात नाइट कर्फ्यू लावला आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ८८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ कोरोनाबाधित आढळले. त्याने महाराष्ट्राचे टेन्शन वाढले असून याबाबत तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. देशातील अन्य राज्यांमधील स्थिती, तेथे लावण्यात आलेले निर्बंध याबाबतचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला. यूरोपमधील ब्रिटन व अन्य देशांत कोविड स्थिती भीषण आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्रात कोणती पावले उचलली जावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मतेही विचारात घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या असून बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

नाताळ सण, नववर्षाचे सेलिब्रेशन या गोष्टी लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली व याबाबत शुक्रवारी (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी बैठकीत सहभाग घेतला व सूचना केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -