रामदास कदमांना विधानभवनाच्या गेटवर पोलिसांनी अडवले

मुंबई  : शिवसेना पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात 'साईडलाईन' झालेल्या रामदास कदम यांची शुक्रवारी विधिमंडळात घडलेल्या एका प्रसंगामुळे पंचाईत झाली. रामदास कदम यांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे कोरोना नेगेटिव्ह अहवाल नसल्यामुळे पोलीस त्यांना आत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला.


मात्र, तरीही त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले. शिवसेनेतील त्यांचे जुने सहकारी आणि विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले. एकनाथ शिंदे यांनी स्वत: हस्तक्षेप करत कदम यांना विधानभवनात प्रवेश मिळवून दिला.

Comments
Add Comment

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे