
बीजिंग : चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केली. वुहानमध्ये दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव झालेला व त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.
आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे चीनने स्पष्ट केले. चीनमधील शीआन शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे.