Saturday, July 20, 2024
Homeदेशमराठमोळे मिसाईल मॅन अतुल राणेंची ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी निवड

मराठमोळे मिसाईल मॅन अतुल राणेंची ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली : डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे (Atul Rane) यांनी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या (Brahmos Aerospace) सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते.

अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांचे मूळगाव आहे. चेन्नईत शिक्षण घेतल्यानंतर अतुल राणे यांनी पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये कार्यरत आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.

अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्युटरचे स्वदेशी डिझाईन बनवणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअरच्या विकास आणि डिफेन्स अ‌ॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये १९८७ पासून योगदान देत आहेत.

अतुल राणे यांनी चेन्नईच्या Guindy Enginering College मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसित होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-१ मिसाईलच बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे नेतृत्त्व केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -