Tuesday, July 1, 2025

थंडीमुळे अनेकजण सांधेदुखीच्या त्रासाने हैराण

थंडीमुळे अनेकजण सांधेदुखीच्या त्रासाने हैराण

ठाणे (वार्ताहर) : हिवाळ्यातील थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असली तरी काही जणांसाठी हवेतील हा गारवा वेदनादायी ठरत आहे. कारण, हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.



संधिवात असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अतिशय अवघड असतो. त्याचप्रमाणे यंदा सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रासही सुरू झाला आहे. गुडघे व सांध्यांच्या दुखण्याने हैराण झालेले अनेक रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



थंडी वाढल्याने विशेषतः वातरक्त आणि आमवात यांसारखे आजार आहेत. त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. ज्यामुळे वेदना, सूज, जळजळ आणि सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवतात. थंडीमध्ये सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची शक्यता असते. युरिक अॅसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेषकरून जेथे हाडांचे जॉईंट्स असतात तेथे अडकते आणि वेदना सुरू होतात.



यावेळी डॉ. अभय गायकवाड म्हणाले यांनी, थंडी सुरू झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हिवाळ्यात सांधेदुखीचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment