
धुळे : ‘तुम्ही सगळे कसे आहात’ असे म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘मी उत्तरप्रदेशातून आलो आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. मी महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा मला खूप आनंद होतो. वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीची ओळख आहे. आजही केवळ महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे शिवाजी महाराज भरलेले आहेत. अमेरिका धनवान आहे, म्हणून तिथले रस्ते चांगले नाही तर सरकार धनवान आहे म्हणून रस्ते चांगले आहेत. नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरू आहे’, असे ते म्हणाले.
त्यांच्या हस्ते दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे उद्घाटन झालं. त्यांच्या हस्ते जनरल बिपिन रावत या रोडचे उद्घाटन देखील झालं. तसेच श्रीमंत राजे दौलतसिंह रावल यांचा पुतळा, शहीद अब्दुल हमीद स्मारक आणि वॉर ट्रॉफी पुतळ्याचे देखील राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण झालं.