Tuesday, July 1, 2025

एसएसपीएम हॉस्पिटलतर्फे १५० रूग्णांची मोफत तपासणी

एसएसपीएम हॉस्पिटलतर्फे १५० रूग्णांची मोफत तपासणी

राजापूर :सिंधुदुर्गातील एसएसपीएम हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील कोंडसर, कशेळी व भालावली गावात मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे १०० ते १५० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरातील गरजू रूग्णांची एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.



या शिबिरात रूग्णांची नेत्रतपासणी, रक्तदाब तपासणी, गुडघे, सांधेदुखी आदी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. एसएसपीएम हॉस्पिटलचे समन्वयक हरिश्चंद्र परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.भुषण पाताडे, डॉ.जोशी यांनी रूग्णांची तपासणी केली. यातील मोतीबिंदू रूग्णांची व गुडघ्याच्या आजाराने त्रस्त रूग्णांची एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही रूग्णांवर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.



कशेळी येथे झालेले हे शिबिर यशस्वीतेसाठी भाजपचे वसंत पाटील, दीपक हळदणकर, वृषाली पाटील, सीमा गोठणकर, पल्लवी सावरे, पद्माकर कशाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.भालावली येथे दिलीप मांजरेकर, ज्ञानदेव भोसले, अमोल नार्वेकर, प्रसाद भोसले यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. या ठिकाणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी भेट दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >