लखनऊ : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तर आता उत्तर प्रदेश सरकारनेही राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसपासून उत्तर प्रदेशात याची अमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.
याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधने आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये कोरोनासंबंधी नियमांचे कठोर पालन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनबरोबरच करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.