Saturday, July 5, 2025

अल्पवयीन मुलांवर अत्याचार प्रकरणी तिघांना अटक

अल्पवयीन मुलांवर अत्याचार प्रकरणी तिघांना अटक

पुणे : अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून अश्‍लिल व्हिडिओ तयार करणाऱ्या तीन २० वर्षीय तरुणांना हवेली पोलिसांनी अटक केली आहे.


ईश्‍वर अशोक शिंदे, नीलेश सूर्यकांत नेटके, आणि कुणाल राजेश भांगरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


आरोपी ईश्‍वर अशोक शिंदे हा सहकारनगर हद्दीत तळजाई टेकडीवर संशयास्पदरित्या आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये तो साथीदारांसह अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे अश्‍लील व्हिडिओ आढळून आले. त्यानुसार हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment