पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ४०१ एसटी बस अद्याप आगारातच उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक होऊन संघटनेचे नेते अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी काही कामगार संघटना अद्याप नाराज असल्याचे समोर आले आहे.
एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. २२ डिसेंबर ला याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी सांगितले की हा संप नसुन दुखवटा आहे आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत पुढील तारीख ५ जानेवारी दिली असून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. कर्मचारी मात्र मागणीवर ठाम आहेत.
९१ जणांची सेवा समाप्त करणार
पालघर जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. सरकारने पगारवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले. अनेक कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. अशा ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाण्याची शक्यता आहे.
४५ दिवसांत २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान
पालघर जिल्ह्यात एसटीच्या संपामुळे सर्वसामान्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. यामुळे पालघर एसटी विभागाचे तब्बल २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कर्मचाऱ्यांना हवे विलीनीकरण
सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतर सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरणच हवे आहे. अद्याप बहुसंख्य कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी सरकारने दिलेली पगारवाढ नाकारली आहे.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…