Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सचिनकडून मोहम्मद सिराजचे कौतुक

सचिनकडून मोहम्मद सिराजचे कौतुक

नवी दिल्ली: विक्रमवीर सचिन तेंडुलकरने युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. त्याच्या पायात स्प्रिंग आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्याची बॉलिंग पाहायला मला खूप आवडते.

२७ वर्षीय सिराजची ऊर्जा आणि देहबोलीचेही कौतुक करताना, सिराजची धावपळ तुम्ही पहा. तो पूर्णपणे उर्जेने भरलेला दिसतो. मोहम्मद सिराज हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याला पाहून तुम्ही अंदाज लावू शकत नाही, की तो दिवसाचे पहिले षटक टाकत आहे की शेवटचे. पूर्ण दिवसभर तो तग धरून गोलंदाजी करतो. त्याचा हा गुण मला आवडतो, असे सचिनने एका मुलाखतीत म्हटले आहे.

सिराजने पदार्पणाच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या होते. पदार्पणाची आठवण करून देताना सचिन म्हणाला, पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सिराजने ५ विकेट घेऊन आपण परिपक्व गोलंदाज असल्याचे दाखवून दिले. हा भारतीय गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजावर सतत दबाव राखतो. मॅच्युरिटी पाहता तो खूप दिवसांपासून खेळतोय असे वाटले. सिराज उत्तम तयारी करतो. जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा तो काहीतरी नवीन घेऊन येतो, असे सचिनने पुढे सांगितले. कौतुक केल्यानंतर सिराजने सचिनचे आभार मानले. धन्यवाद सचिन सर. हे माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. देशासाठी मी नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न करेन. निरोगी राहा, असे ट्वीट सिराजने केले आहे.

सिराज सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली हा जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीसह सिराजला अंतिम संघात संधी देऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा