
कर्जत :महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची फाईल माझ्याकडे आली आहे. दोन ते तीन भाषांबाबतही प्रस्ताव आला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले.
याबाबत खासदार बारणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा, सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली होती.