ठाणे : आयएसआय मार्कचा गैरवापर करून सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची (reeha water bottle) मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खुलेआम विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई यांनी IS (भारतीय मानक) 14543 नुसार ‘सीलबंद पेयजल बाटलीवरील’ ISI मार्कचा गैरवापर तपासण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अंमलबजावणी शोध घेतला आणि जप्तीची कारवाई केली.
मे. अम्मार वॉटर (2298, खोली क्रमांक 3, बस्ती कंपाऊंड, शांतीनगर रोड, नागाव II, भिवंडी-421302, ठाणे) च्या आवारात छापा टाकताना ही संस्था वैध परवान्याशिवाय ‘रीहा’ ब्रँडसह भिन्न परवाना क्रमांक – CM/L.No-7200168205 वापरून सीलबंद केलेले पेयजल भरून BIS प्रमाणन चिन्हाचा (म्हणजे ISI मार्क) गैरवापर करत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान IS 14543:2016 नुसार सुमारे 6,408 एक लिटर PET (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) बाटल्या आणि अर्ध्या लिटरच्या 8,472 PET बाटल्या जप्त करण्यात आल्या. बीआयएस मुंबईचे अधिकारी निशिकांत सिंग, क श्रेणीचे वैज्ञानिक आणि ब श्रेणीचे वैज्ञानिक विवेकवर्धन रेड्डी, यांनी शोध आणि जप्तीची कारवाई केली.
BIS मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा BIS कायदा 2016 नुसार किमान 2,00,000 रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जात आहे.
बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. म्हणून, सर्वांनी बीआयएस संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI चिन्हाचा खरेपणा तपासण्याची विनंती केली जात आहे.
गैरवापर आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन
नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास ते प्रमुख, MUBO-II, वेस्टर्न रीजनल ऑफिस, BIS, Manakalaya, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093 यांना कळवावे. अशा तक्रारी [email protected] या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.