‘मी कधीच मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही’ – उर्फी जावेद

मुंबई : कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर दररोज कमेंटचा वर्षाव करत असतात.


बिग बॉस स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद ही सोशल मीडियावरून खूपच ऍक्‍टिव्ह राहिली आहे. उर्फी नेहमीच तिच्या इंस्टाग्रामवर बोल्ड फोट शेअर करत असते. यावर तिला सोशल मीडिया युजर्सकडून कधी चांगल्या कॉमेंट्स वर्षाव होत असतो तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.


या ट्रोलिंग बाबत सांगतांना ती म्हणाली आहे की,’ ‘मी मुस्लिम मुलगी आहे. पण माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट्स करणारे सर्वाधिक मुस्लिमच असतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करतेय, असे त्यांना वाटते. ते माझा तिरस्कार करतात. कारण आपल्या महिलांनी एका विशिष्ट पद्धतीनेच वागावे, असे मुस्लिम पुरूषांना वाटते.


ते सर्व महिलांना नियंत्रित करू इच्छितात. हेच कारण आहे की मी इस्लाम मानत नाही. मी त्यांच्या म्हणण्यानुसार वागत नाही, म्हणून ते मला ट्रोल करतात, माझा राग करतात. त्यामुळे मी कधीही मुस्लिम पुरूषाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम वा अन्य कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला आवडेल, त्या व्यक्तिशी मी लग्न करेल.’


उर्फीच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ‘सात फेरी की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ सारख्या टीव्ही शोमध्ये ती टीव्हीवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे.


उर्फीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले, तरी बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर उर्फी अधिक लोकप्रिय झाली.


या शोमधला तिचा प्रवास खूपच छोटा होता, पण शोमुळे तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत गेली आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम