ब्रायन लारा हैदराबादचा फलंदाजी प्रशिक्षक

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांची अनुभव इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादच्या अनुक्रमे फलंदाजी प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. टॉम मूडी हे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.



कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज लाराला हैदराबाद फ्रँचायझीने धोरणात्मक सल्लागार बनवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काऊट अशी दुहेरी भूमिका निभावणार आहेत. मुथय्या मुरलीधरनसारखा दिग्गज या फ्रँचायझीशी आधीच जोडला गेला आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच मुरलीधरन संघासाठी रणनीतीकार म्हणूनही काम पाहतो.



ब्रायन लाराने वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना १३३ कसोटी, २९९ वनडे खेळले. त्याने कसोटीत ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ११,९५३ धावा केल्या. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये १९ शतकांच्या मदतीने १०,४०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५३ शतके आणि २२३५८ धावा आहेत.



लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५०१ धावा केल्या आहेत. आपल्या काळातील मोठ्या खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला लारा हा आक्रमक फलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ९ द्विशतके आहेत. यात दोन त्रिशतके आहेत. लाराने १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ आणि २००४ मध्ये ४०० धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

Haryana Accident : हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात झूला कोसळल्याने मोठा अपघात

हरियाणा: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील

Barking Deer: तुम्ही पाहिलंत का कधी 'भुंकणारं हरीण'?; जाणून घ्या भुकणाऱ्या हरणाबद्दल

जर तुम्ही जंगलात किंवा डोंगराळ भागात असाल आणि अचानक तुम्हाला कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यामुळे भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाला मिळणार बळकटी

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे