Friday, October 4, 2024
Homeक्रीडाब्रायन लारा हैदराबादचा फलंदाजी प्रशिक्षक

ब्रायन लारा हैदराबादचा फलंदाजी प्रशिक्षक

स्टेनकडे गोलंदाजी कोचची धुरा

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांची अनुभव इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादच्या अनुक्रमे फलंदाजी प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. टॉम मूडी हे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज लाराला हैदराबाद फ्रँचायझीने धोरणात्मक सल्लागार बनवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काऊट अशी दुहेरी भूमिका निभावणार आहेत. मुथय्या मुरलीधरनसारखा दिग्गज या फ्रँचायझीशी आधीच जोडला गेला आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच मुरलीधरन संघासाठी रणनीतीकार म्हणूनही काम पाहतो.

ब्रायन लाराने वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना १३३ कसोटी, २९९ वनडे खेळले. त्याने कसोटीत ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ११,९५३ धावा केल्या. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये १९ शतकांच्या मदतीने १०,४०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५३ शतके आणि २२३५८ धावा आहेत.

लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५०१ धावा केल्या आहेत. आपल्या काळातील मोठ्या खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला लारा हा आक्रमक फलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ९ द्विशतके आहेत. यात दोन त्रिशतके आहेत. लाराने १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ आणि २००४ मध्ये ४०० धावा केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -