नवी दिल्ली : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू आणि शनेलच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर यांच्यानंतर आणखी एका भारतीय वंशांच्या महिलेने भारतीयांची मान उंचावली आहे. अडल्ट वेबसाइट ओन्ली फॅन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय वंशांच्या आम्रपाली गन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओन्ली फॅन्सचे संस्थापक टीम स्टोकली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्रपाली यांची नियुक्ती करण्यात आली. ओन्ली फॅन्सची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली आहे. स्थापनेपासूनच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी टीम हे कार्यरत होते. काही नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा दिला असल्याचे टीम यांनी नमूद केले.
नियुक्तीनंतर आम्रपाली म्हणाल्या की, माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी टीम आणि ओन्ली फॅन्सची आभारी आहे. मला दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोनं करेन. माझी जबाबदारी मी उत्तमरित्या पार पाडेन, असे तिने सांगितले.
आम्रपालीने यापूर्वी रेडबुल आणि क्वेस्ट न्यूट्रिशनसाठीची जबाबदारी पार पाडली आहे.