Sunday, October 19, 2025
Happy Diwali

चिंतेत भर! देशात ओमायक्रॉनचे २२० रुग्ण

चिंतेत भर! देशात ओमायक्रॉनचे २२० रुग्ण

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने भारतात चिंता वाढवली आहे. देशातील १४ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. एकूण रुग्णसंख्या २२० वर पोहचली असून त्यात सर्वाधिक ६५ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीत ५४ तर तेलंगणमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर कर्नाटक (१९), राजस्थान (१८), केरळ (१५) आणि गुजरात (१४) यांचा समावेश आहे. यामधील ७७ रुग्ण उपचारानंतर बरे किंवा स्थलांतरित झाले आहेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ११ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या ६५ इतकी झाली आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-१९ आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सूचनांचे पत्र पाठवण्यात आले आहे.

ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Comments
Add Comment