मुंबई : महाराष्ट्राला अनेक सण, व्रतवैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. हि कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षक लवकरच पाहू शकतील.
झी मराठीवर ‘सत्यवान सावित्री’ ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोची झलक नुकतीच प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिली आणि त्याने प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या मालिकेत कोण कलाकार असणार आहेत? ही माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.