Sunday, October 26, 2025
Happy Diwali

टोमॅटोच्या कॅरेटमध्ये निघाली चक्क दारू

टोमॅटोच्या कॅरेटमध्ये निघाली चक्क दारू

नाशिक  : नववर्षाचे स्वागत तथा 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. त्यात चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अवैध मद्याचा तब्बल 7 लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून नेण्यात येत होता. या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून बेकायदेशीररित्या टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनात टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.

दरम्यान दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता याचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment