Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यात पेपरमध्ये वडापाव बांधून दिल्यास दंडात्मक कारवाई

पुण्यात पेपरमध्ये वडापाव बांधून दिल्यास दंडात्मक कारवाई

पुणे : पुण्यात आता वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र  प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे बटाटावडा किंवा तत्सम पदार्थ आता पेपरमध्ये पॅक करून मिळणार नाही. गरमागरम पदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचं आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वर्तमानपत्राच्या कागदामधील  शाई  पचनक्रियेत बिघाड करण्यास  कारणीभूत ठरतात, वर्तमानपत्र किवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. त्यामध्ये डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अन्नपदार्थाचे पॅकिंग त्वरित बंद करण्याचे आदेश छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते यांना देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -