Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडी२००पेक्षा अधिक लोकांसाठी परवानगी सक्तीची

२००पेक्षा अधिक लोकांसाठी परवानगी सक्तीची

पार्ट्या, लग्न, समारंभांसाठी पालिकेची नवी नियमावली

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पार्ट्या, लग्न, समारंभात २००पेक्षा जास्त लोक असल्यास मनपा सहाय्यक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

मुंबईत सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असून भीती वाढत आहे. त्यातच आता ख्रिसमस शनिवारपासून सुरू होत असून नववर्षाचे स्वागतही मुंबईत उत्साहात केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमसनिमित्त मुंबईत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे.

दरम्यान हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील. आयोजकांना मात्र हे नियम बंधनकारक आहेत. तसेच पालिकेच्या फिरत्या पथकांकडून अचानक अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे

खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे. हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -