Monday, October 20, 2025
Happy Diwali

तर शाळा पुन्हा बंद करू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

तर शाळा पुन्हा बंद करू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनामुळे २० महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेल्या राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून आणि मुंबईतल्या शाळा १५ डिसेंबरपासून पुन्हा गजबजल्या. मात्र कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता शाळा पुन्हा बंद होऊ शकतात, असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली. आता हा आकडा ६५ च्या पुढे गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर 'ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत,' असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >