Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रविधिमंडळ विशेषराजकीयमहत्वाची बातमी

'पंतप्रधानां'वरुन विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी माफी मागितली

'पंतप्रधानां'वरुन विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी माफी मागितली

मुंबई : विधानसभेचे कामकाज चालू असताना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. यानंतर सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो, असे म्हणत हा वाद संपुष्टात आणला.


आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख मंत्री नितीन राऊत यांनी केला आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. प्रचंड गदारोळ झाल्याने अध्यक्षांनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूबही केले.


त्याआधी, वीजेसंदर्भातील एका प्रश्नावर बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले की, १०० युनिट माफ करणार याकडे मी तुम्हांला घेऊन जाईल. मी उर्जा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माझं व्हिजन सांगितलं होतं. मात्र कोविडची परिस्थिती आली. कंपनी चालवताना वीज बील भरले पाहिजे. सुट दिली पाहिजे, असं म्हणत असतील तर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिलं का? असं राऊत म्हणाले.


यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कमालीचे आक्रमक झाले. पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे दाखवा नाही तर माफी मागावी, असं ते म्हणाले. या सभागृहाच्या बाहेरील व्यक्ती संदर्भात असं बोलता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे किवा शब्द मागे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. यावर नितीन राऊत म्हणाले की, पंतप्रधान यांनी पहिल्या निवडणुकीत काळा पैसा परत आणला जाईल आणि त्यातून १५ लाख रुपये दिले जातील असं म्हटलं होतं. हे खोटं असेल तर सिद्ध करून दाखवा, असं राऊत म्हणाले.


यावर आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी हे निवडणुकीच्या जाहीर सभेत बोललेल्या संभाषणाची हिंदीतून नक्कल केली. यानंतर विरोधक जास्तच आक्रमक झाले. फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना निलंबित करा. पंतप्रधानांचं अंगविक्षेप करत जाधव यांनी सभागृहात जे वर्तन केलंय ते चुकीचं आहे. ते पंतप्रधान यांची नक्कल करत आहेत. या ठिकाणी अशा प्रकारची नक्कल करणं योग्य आहे का? असं फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment