 
                            मुंबई : 'मुलगी झाली हो' या मालिकेत शौनकसोबत विवाहबंधनात अडकलेल्या साजिरीचा खऱ्या आयुष्यातही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. साजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
 
नुकताच दिव्याचा टिळक समारंभ पार पडलाय. अक्षय घरतसोबत दिव्या लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलय. शिवाय या जोडीचे फोटोही सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत. अक्षय हा न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. अक्षय आणि दिव्याची मैत्री मोठ्या कालावधीपासूनची आहे. मात्र या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच काय तर दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने तिच्या मालिकेच्या सेटवर जाऊन तिला सरप्राईज दिले होते.
 
तेव्हा लवकरच ही गोड जोडी लगीनगाठ बांधून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे लग्न नेमकं कधी असेल हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी त्यांच्या टिळक समारंभाचे फोटो समोर आले आहेत.
 
                            
 
     
    




