त्र्यंबकेश्वर :प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृह प्रवेशासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ येऊ देऊ नये, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मंदिरातील गर्भगृहात जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मनाई केलेली आहे.
ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी हरीगिरीजी महाराज यांनी केली आहे. कोविड काळ आणि प्राचीन पिंडीचे रक्षण व्हावे या हेतूने पिंडीजवळ जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सध्या मनाई केली आहे. सोवळे नेसून पिंडीजवळ जाण्याची पद्धत आहे. पुरोहितांबरोबरच साधूंनाही सध्या गर्भगृहात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याबाबत स्थानिक साधू महंत यांच्यावतीने देवस्थान ट्रस्टला पत्र देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर ते सौराष्ट्र सोमनाथ ही ज्योतिर्लिंगांची दोन ठिकाणे रेल्वेने जोडावीत अशी मागणी आखाडा परिषदेच्यावतीने केली आहे. महामंडलेश्वर नगर पिंपळद येथे भेट दिल्यानंतर नील पर्वतावर ते बोलत होते. आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी त्र्यंबकेश्वर रेल्वेने जोडावे अशी मागणी वाढत आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…