Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीपरदेशातून मुंबईत आलेल्या १५४ जणांना कोरोना

परदेशातून मुंबईत आलेल्या १५४ जणांना कोरोना

मुंबई (प्रतिनिधी) : ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानंतर मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या महापालिका आरटी-पीसीआर चाचण्या करत आहे. यामध्ये १५४ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले आहे, तर बाधितांना पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ओमायक्रॉनमुळे जगभरात चिंता पसरली असताना परदेशातून आलेल्या प्रवाशांची पालिकेकडून कडक तपासणी होत आहे. यात आतापर्यंत तपासणी केलेल्यांपैकी १५४ प्रवाशांना कोविडची बाधा झाली आहे. बाधितांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ५४ जणांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडून देण्यात आले असल्याची माहिती सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बालकृष्ण अडसूळ यांनी दिली.

दरम्यान यातील अधिक रुग्ण लक्षणविरहित, तर काही जणांना सौम्य लक्षणे असल्याचे देखील सामोरे आले आहे. एकाही रुग्णाला आयसीयू किंवा ऑक्सिजनची गरज भासली नसल्याचे अडसूळ यांनी सांगितले, तर विमानतळावरील पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सक्तीचे विलगीकरण असून ओमायक्रॉन विषाणू पसरू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

बाधित रुग्णांचे नमूने प्रयोगशाळा तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठवले जातात. आतापर्यंत २२ प्रवासी ओमायक्रॉन बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापैकी १३ रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले, तर बाकी रुग्णांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -