Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मोखाडा: मतदान शांततेत

मोखाडा: मतदान शांततेत

मोखाडा :अतिशय चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या मोखाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी महिला ३ हजार २२ व पुरुष २ हजार ८२५ पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला असून एकूण ५ हजार ८४७ महिला पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला. या निवडणुकीत एकूण ८४ टक्के मतदान झाले.

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली व ५.३० वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त बजावला असून किरकोळ भांडणे वगळता ही निवडणूक शांततेत पार पडली.या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीमच्या आत बंदिस्त झाले असून शिवसेना, भाजप, जिजाऊ संघटना, राष्ट्रवादी, बविआ, मित्रपक्ष यांच्यामध्ये चुरशीच्या लढत आहे. तथापि, कोणता उमेदवार विजय खेचून आणतो व मतदार सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात देतात, यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

या निवडणुकीसाठी एक पोलीस उपअधीक्षक, ७० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या एका प्लाटोनिकचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीसाठीची मतदानप्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. तथापि, उमेदवारांसह मतदारांनाही १९ जानेवारीच्या निकालाची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment