Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडी'आयफोन १३' तयार होणार भारतात

‘आयफोन १३’ तयार होणार भारतात

मोबाईल विश्वात नवी क्रांती

मुंबई : मोबाईल विश्वात नवी क्रांती होणार आहे. कारण  आता  आयफोन १३ ‘मेड इन इंडिया’ होणार आहे. म्हणजेच या फोनची निर्मिती भारतात सुरु होणार आहे.  चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये  आयफोन १३  सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन देखील सुरू झालं आहे. भारतात आयफोन 1१३ चे कमर्शियल प्रोडक्शन लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. खास बात म्हणजे हे इंडिया मेड आयफोन २०२२  वर्षापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील.

मीडिया रिपोर्टनुसार, अॅपलला त्यांचे सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स भारतात बनवायचे आहेत. कंपनी लवकरच देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी आयफोन १३ चे उत्पादन सुरू करेल. तसंच पुरवठ्याचा आभाव असूनही अॅपलने सेमीकंडक्टर चिप्स साठवल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -