
पुणे : म्हाडा (MHADA) आणि टीईटी (TET) परीक्षांमध्ये पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्यापासून सुरू झालेल्या घटनेतील आरोपींच्या यादीत आता आणखी काही मोठ्या नावांचा समावेश होत आहे. त्यातच आता परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले हे तिसरे मोठे नाव आहे.