Tuesday, November 12, 2024
Homeताज्या घडामोडीपैशांसाठी अनिल चव्हाण यांची हत्या

पैशांसाठी अनिल चव्हाण यांची हत्या

चार आरोपी कर्जत पोलिसांच्या ताब्यात

कर्जत :कर्जत शहरातील दहिवली भागातील सेवालालनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून चाकू आणि दगड यांच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते. त्यातील अनिल चव्हाण यांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असून त्यातील अन्य जखमींपैकी एक अत्यवस्थ आहे.

कर्जत शहरातील दहिवलीमध्ये सेवालाल मंदिरासमोर १८ डिसेंबरच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांमध्ये पैशांची देवाण-घेवाणीवरून बाचाबाची झाली. त्याच वस्तीमधील रोहन गुंजाळ हा गणेश संजय राठोड यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. मात्र, गणेशने रोहनला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रोहन गुंजाळने बाबू ऊर्फ सुमित गुंजाळ, नीलेश गेरेजवाला ऊर्फ निल्या आणि सुमित याचा नातेवाईक या सर्वांना बोलावून घेतले.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेले अनिल हरी चव्हाण, सुनील हरी चव्हाण, रवी चव्हाण यांना शिवीगाळ करू लागले. या सर्वांनी संगनमत करून बाबू ऊर्फ सुमित गुंजाळ याने त्या ठिकाणी आलेले अनिल हरी चव्हाण आणि सुनील हरी चव्हाण यांच्याशी असलेले पूर्ववैमनस्यातून धारदार चाकूच्या साहाय्याने पाठीवर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात सोहम संजय मोरे, अनिल हरी चव्हाण, सुनील हरी चव्हाण आणि गणेश संजय राठोड हे जखमी झाले.

उपचारादरम्यान अनिल हरी चव्हाण याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं.३२३/२१ ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर एकाचा मृत्यू झाल्यानंतर ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी रोहन गुंजाळ, सुमित गुंजाळ याच्या सह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की तसेच सहा.पोलीस निरीक्षक सं. सोनावणे व कर्जत पोलीस ठाण्याची सर्व टीममार्फत सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -