
२०१८ ते २०२० या कालावधीत अनेक वेळा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. या सर्व काळात मी सतत चांगले करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु गोष्टी कठीण होत होत्या. सहा चेंडू टाकल्यावर मला दम लागत होता, संपूर्ण शरीर थकले होते. गुडघेदुखी वाढली की मी लहान उडी मारून गोलंदाजी करायचो. सहकारी खेळाडू माझ्या दुखापतीबद्दल संवेदनशील नव्हते आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला, मात्र असे घडले नाही. मी संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही, असे अश्विनने सांगितले.
अश्विन हा भारताच्या कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असण्यासोबतच अश्विनने अनेक वेळा बॅटनेही दमदार कामगिरी केली आहे आणि भारतासाठी सामने जिंकले आहेत. खराब फॉर्मवर मात करत त्याने टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतीय संघातही स्थान मिळवले. सध्या तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका खेळणार असला तरी वनडे मालिकेतही त्याचा संघात समावेश होऊ शकतो.
वडिलांचे म्हणणे खरे ठरले
२०१८ मध्ये मी पुन्हा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा मी अनेकदा निवृत्ती घेण्याचा विचार केला. यावेळी मी केवळ पत्नीशीच बोलत असे. माझ्या वडिलांना विश्वास होता की एक दिवस त्यांचा मुलगा एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघात परत येईल आणि मृत्यूपूर्वी ते पाहू शकेल. त्याच्यासाठी ही खूप वैयक्तिक गोष्ट होती, असे अश्विनने म्हटले.