Thursday, January 15, 2026

रवींद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एक नेताला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वायकर यांची  चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत.

वायकर यांच्या चौकशीबाबत गुप्तता बाळगणे्यात आली होती. कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण वायकर यांच्या चौकशीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment