Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अभिषेक बच्चनचा अपमान होतो तेव्हा....

मुंबई : फिल्म स्टार्सचे किस्से नेहमीच चवीने चर्चिले जातात. असा एक किस्सा अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. एका कार्यक्रमामध्ये त्याला चुकीची वागणूक देण्यात आल्याचे तसेच त्याला न सांगता चित्रपटातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अभिषेकने या मुलाखतीत केलाय. अभिषेकने या मुलाखतीत म्हटले की, ‘एकदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेही कोणतीही माहिती न देता. जेव्हा मी चित्रीकरणासाठी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सीन शूट करणे सुरु होते. ते पाहून मी तेथून निघून गेलो. त्यानंतर मी अनेकांना फोन केले. त्यांनी कुणीही माझे फोन उचलले नाहीत’ असे अभिषेके म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘मी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा मला पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले होते. पण तेथे जेव्हा एक लोकप्रिय अभिनेता आला तेव्हा मला उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. या सर्व गोष्टी तुम्ही पर्सनली घेऊ शकत नाही कारण तो त्या कार्यक्रमाचा एक भागच असतो. हा प्रकार घडल्यानंतर मी घरी आले आणि आता यापुढे आणखी मेहनत घेऊन काम करेन असे ठरवले. मी त्यांच्या पेक्षा मोठा अभिनेता बनेन आणि पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळवेन असे ठरवले होते.’

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा