Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीहे दारू विकणाऱ्यांचे सरकार

हे दारू विकणाऱ्यांचे सरकार

देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर गंभीर आरोप

भंडारा (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘हे दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे’, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला आहे. तसेच, ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले, असा आरोपही त्यांनी आघाडी सरकारवर केला. फडणवीस यांनी भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

फडणवीस म्हणाले की, ‘कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केलेली नाही. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवरील ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे’, असा आरोप फडणवीसांनी केला.

त्यांनी गोंदियाच्या सभेप्रमाणे बोनसबाबत सरकारची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोलेंवरही निशाणा साधला. हे ‘रोज संविधान खतरे में’, असे म्हणतात. धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना त्याबाबत बोलत नाहीत’, अशा परखड शब्दांत त्यांनी नानांना सुनावले.

फडणवीसांनी सरकारवर आरोप केला आहे की, ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती वेळेत तयार न केल्याने राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत हे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -