Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडी‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी केंद्र सरकार करणार मदत

‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी केंद्र सरकार करणार मदत

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घोषणा

नाशिक (प्रतिनिधी ) :‘नमामि गोदा’ प्रकल्पासंदर्भात नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा केली. या वेळी ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी निधी मंजूर केला असल्याचे केंद्रीय मंत्री शेखावत यांनी महापौरांना सांगितले.

दोंडाईचा वरवाडे नगर परिषद पाणीपुरवठा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. याप्रसंगी नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी ‘नमामि गंगे’ च्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ या सुमारे अठराशे कोटींच्या प्रकल्पास केंद्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यासंबंधी नाशिक महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सतीश नाना कुलकर्णी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री यांना माहिती देऊन निवेदन सादर केले. त्यानंतर मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्या भाषणामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी त्यांच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत मंजुरी दिली असल्याचे सांगितले.

तसेच त्यासाठी तत्काळ डीपीआर सादर करण्यास सांगितले. त्याचबरेाबर सदर प्रकल्प हा सन २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करु, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यामुळे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना धन्यवाद देणे हे नाशिक नगरीच्यावतीने परमकर्तव्य असल्याच्या भावनेतून महापौर कुलकर्णी यांनी तत्काळ त्यांचे आभार मानले व नाशिक महानगरपालिकेतर्फे ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा डीपीआर तत्काळ सादर करण्यात येईल असे आश्वासनही त्यांना दिले.

यावेळी जलशक्ति मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांच्यासह धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, दोंडाईच्या मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे माजी पर्यटनमंत्री जयकुमार भाऊ रावल, त्याचबरोबर दोंडाईच्या नगर परिषदेचे सन्माननीय सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -