Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा ‘शार्क टँक इंडिया’

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा ‘शार्क टँक इंडिया’

मुंबई (प्रतिनिधी) :स्टार्टअप्स आणि एक नवीन उद्योग उभा करण्याचे चलन आपल्या देशात आता वाढू लागले आहे. समाजातील या बदलाची दखल घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे, शार्क टँक इंडिया. ज्यात अशा नवोदित उद्योजकांना संधी आणि मंच पुरवण्यात येईल, ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण बिझनेस कल्पना आहेत, बिझनेस प्रोटोटाईप्स आहेत किंवा ज्यांचा एक सक्रिय व्यवसाय आहे. अशा उद्योजकांच्या प्रस्तावांचे मूल्यांकन तज्ज्ञ व्यावसायिकांकडून म्हणजे शार्क्सकडून करण्यात येईल व त्यांच्या व्यवसायांत गुंतवणूक करण्याबाबत हे शार्क्स विचार करतील. स्टुडिओनेक्स्टद्वारा निर्मित या क्रांतिकारी शोचे प्रस्तुतकर्ता प्रायोजक अपग्रॅड असून तो फ्लिपकार्टद्वारा को-पावर्ड आहे. २० डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या शार्क टँक इंडियाच्या जगात बुडी मारा, प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

शार्क टँक इंडिया केवळ सहभागी किंवा पिचर्सना मार्गदर्शन देणार नाही, तर इतर लोकांनाही व्यापार-धंद्याविषयीच्या विविध बारकाव्यांविषयी माहिती देऊन त्यातील क्षमता दाखवून देईल. या संभाव्य व्यवसायांत गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या विविध क्षेत्रातील होतकरू व्यावसायिकांना मार्गदर्शन देण्यासाठी ‘शार्क्स’ सज्ज झाले आहेत, जे स्वतः अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत.

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या आवृत्तीमधील शार्क्स आहेत – अशनीर अशनीर ग्रोव्हर (भारतपे चा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक), विनीता सिंह (शुगर कॉस्मेटिक्सची सीइओ आणि सहसंस्थापक), पीयुष बन्सल (लेन्सकार्टचा संस्थापक आणि सीइओ), नमिता थापर (एमक्योर फार्मास्यूटिकल्सची कार्यकारी संचालक), अनुपम मित्तल (शादी.कॉम – पीपल ग्रुपचा संस्थापक आणि सीइओ), गझल अलग (ममाअर्थची सह-संस्थापक आणि मुख्य ममा) आणि अमन गुप्ता (बोट कंपनीचा सह-संस्थापक आणि मुख्य मार्केटिंग अधिकारी). हे शार्क्स भारतातील उद्योजकीय एकोसिस्टम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, तर होस्ट रणविजय सिंह या शोमधील पिचर्स आणि प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -