श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीसह १५ बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर!

मुंबई : २०० कोटींच्या कथित मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांनी ईडीसमोर (ED) अनेक खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की, ते शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि श्रद्धा कपूरसह (Shraddha Kapoor) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) संपर्कात होते. त्यानंतर ईडी आता सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवत आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेकर यांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल सांगितले की, ते श्रद्धाला २०१५ पासून ओळखतात. इतकंच नाही तर गेल्या वर्षी ड्रग्ज (drugs) प्रकरणादरम्यान त्याने श्रद्धा कपूरला मदत केली होती. ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूरला गेल्या वर्षी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. श्रद्धा कपूरसोबत सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनाही एनसीबीसमोर हजर व्हावे लागले. त्याचबरोबर, पतीच्या सुटकेसाठी शिल्पा शेट्टीने देखील सुकेशशी संपर्क साधला होता.


श्रद्धा कपूरशिवाय सुकेश चंद्रशेखरने चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीचेही नाव घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की, अलीकडेच शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी (pornography) प्रकरणी तुरुंगात असलेले पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) सशर्त सुटकेसाठी तिने माझ्याशी संपर्क साधला होता.


त्याचबरोबर सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, तो हरमन बावेजालाही (Harman Baweja) ओळखत होता. हरमन बावेजासोबत तो कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अभिनीत कॅप्टन (Captain) चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत होता. सुकेश चंद्रशेखरच्या या खुलाशानंतर आता ईडी या सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ईडीने जॅकलिन फर्नांडिस (Jacquline Fernandes) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही चौकशी केली आहे.


सुकेश चंद्रशेखर हा प्रसिद्ध ठग आहे. त्याच्यावर देशभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग (Shivinder Singh) आणि मलविंदर सिंग (Malvinder Singh) यांची दोनशे कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी मारिया पॉल (Maria Paul) यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्यावर एआयडीएमचे नेते दिनाकरण यांच्याकडून निवडणूक चिन्ह मिळवण्याच्या नावाखाली २ कोटी रुपये उकळल्याचा आरोप देखील आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा