
पुणे : म्हाडा (MHADA), टीईटी (TET) आणि सैन्य भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांना आता आणखी पुरावे सापडत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून ९० लाख रुपये आणि सोने जप्त करण्यात आले होते. त्याच प्रकरणात आता पोलिसांना आणखी माहीती हाती लागली असून, आता तब्बल दीड किलो सोने आणि रोख रक्कम २ कोटी रुपयांचे घबाड त्यांच्या घरातून जप्त करण्यात आले आहे.
तुकाराम सुपे यांच्या घरात यापूर्वी मिळले होते ९० लाख रूपये मिळाले होते. आज दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी घबाड सापडले आहे. पोलिसांच्या तपासात घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि दिड किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.
सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहुन अधिक रक्कम आणि दिड किलोहुन अधिक सोने मिळाले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.