Wednesday, August 27, 2025

कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण, देशात एकूण १५३ बाधित

कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण, देशात एकूण १५३ बाधित

नवी दिल्ली : देशात कोरोनासह ओमायक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ होत असल्याकारणाने चिंता व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत एकूण १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ बाधित आढळले आहेत. त्याच वेळी, राजधानी दिल्लीत २२, तेलंगणात २०, राजस्थानमध्ये १७, कर्नाटकात १४, गुजरातमध्ये ९, केरळमध्ये ११, उत्तर प्रदेशमध्ये दोन, आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि प. बंगालला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता १५३ वर पोहचली आहे.

याआधी, रविवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी सहा महिन्यांनंतर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे ९०२ रुग्ण आढळले.

Comments
Add Comment