Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकण रेल्वेच्या मार्गावर आणखी ३ स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वेच्या मार्गावर आणखी ३ स्पेशल ट्रेन

खेड (प्रतिनिधी) : ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेच्या चार स्पेशल रेल्वेगाड्या शनिवारपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागल्या आहेत. या पाठोपाठ पश्चिम रेल्वे प्रशासनाने आणखी ३ साप्ताहिक गाड्या जाहीर केल्या आहेत. सुरत-मडगावच्या दोन फेऱ्यांसह बांद्रा-करमळी स्पेशल गाडीचा समावेश आहे. २१ डिसेंबरपासून वसईमार्गे धावणाऱ्या तीनही गाड्यांचे आरक्षण १९ डिसेंबरपासून खुले झाले आहे.

ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह जाहीर करण्यात आलेल्या स्पेशल गाड्यांना आतापासून गर्दी उसळत आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहेत. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मध्यरेल्वेच्या दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमळी, करमळी-पनवेल या आरक्षित स्पेशल गाड्या शनिवारपासून धावत आहेत. ०९१९३/०९१९४ क्रमांकाची सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल २१ ते २८ डिसेंबर याकालावधीत धावेल. सुरत येथून सायंकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता सुरतला पोहचेल. १७ डब्यांच्या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी आदी ठिकाणी थांबे आहेत.

०९१८७/०९१८८ क्रमांकाची सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल २२, २४ व २९ डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. सुरत येथून सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात २३, २५, ३० डिसेंबर दरम्यान धावणारी साप्ताहिक स्पेशल मडगाव येथून दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी सुरतला पोहोचेल. या गाडीला १९ डबे जोडण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -