Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणशिवसेनेत वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमप्रमाणे थुंकले जाते

शिवसेनेत वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमप्रमाणे थुंकले जाते

आमदार नितेश राणेंचा सेनेवर निशाणा

कणकवली (प्रतिनिधी) : ‘‘वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकले जाते’’, असे सांगतानाच आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम.

आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा. उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. असंख्य शिवसैनिकांनी रामदास कदम या घटनेचा बोध घ्यायला पाहिजे, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.

‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपवरुन मागील काही दिवसांपासून डाववले जात असलेले रामदास कदम यांनी खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपले आणि आपल्या मुलाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्यासह शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -