Saturday, October 25, 2025
Happy Diwali

रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत

रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत

जळगाव : आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना पाटील यांनी एकनाथ खडसेंना डिवचले. राज्याला ज्ञान शिकवण्याआधी किमान रस्ते तरी चांगले करा, असे म्हणत पाटील यांनी खडसेंना सुनावले.

“माझं आव्हान आहे ३० वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले,” असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा