श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर : रविवारी पहाटे शहरातील हरवान (Harvan, Kashmir) भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LET)चा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवानमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी (Terrorists) जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं रुपांतर चकमकीत झालं.


दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारामुळे जवानांनी देखील प्रत्यूत्तरादाखल गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मागच्या ३३ दिवसांत श्रीनगरमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस, एसएफवरील हल्ले आणि नागरिकांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. खोऱ्यातील, विशेषतः श्रीनगरमधील शांतता बिघडवण्यामागे पाकिस्तानी शक्ती असल्याचे यावरून दिसून येतं असल्याचं काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं.


ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सैफुल्ला, अबू खालिद आणि शवाज या तिघांचा समावेश असून, तिघेही पाकिस्तानच्या कराचीचे रहिवासी आहेत. हे सर्व लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. त्यांनी २०१६ मध्ये घुसखोरी करून हरवानच्या सामान्य भागात वेगवेगळ्या कारवाया केल्या होत्या.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे