Friday, July 12, 2024
Homeदेश'छत्रपती शिवाजी माझा आदर्श'- बसवराज बोम्मई

‘छत्रपती शिवाजी माझा आदर्श’- बसवराज बोम्मई

बंगळुरू (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज माझा आदर्श असून त्यांच्याविषयी आदराची भावना असल्याचे स्पष्टीकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. छत्रपतींच्या संदर्भात बोंम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर खुलासा करताना ते बोलत होते.

बंगळुरूमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून, अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत बसवराज बोमय्या यांनी व्यक्त केले होते. यावरून त्यांच्यावर टीका होतेय. याप्रकरणी आज, रविवारी स्पष्टीकरण देताना बोम्मई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आदर्श आहेत. काही समाजकंटकांकडून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न होत आहे.

भाषा आणि इतर मुद्द्यावरून हे लोक फूट पाडत आहेत. लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यावर कठोर कारवाई करू. हे सर्व समाजकंटक आहेत. कारण मी सर्व देशभक्तांचा आदर करतो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कुणालाही दुखावलेले नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही, ते माझ्या रक्तातच नाही. छत्रपती शिवरायांचा, सांगोली रायन्ना अशा देशभक्तांचा आदर केला पाहिजे हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -