मन की बात साठी विचार पाठवीत राहा : पंतपधान नरेंद मोदी

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या मन की बात संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " २६ डिसेंबर रोजी आयोजित आणि २०२१ वर्षाच्या अंतिम मन की बात साठी मला अनेक कल्पना आणि माहिती प्राप्त होते आहे. या सूचनांमध्ये विविध विषय आणि विविध क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडविण्यासाठी जे तळागाळात कार्यरत आहेत अशा अनेकांच्या कथांचा समावेश आहे. आपले विचार पाठवीत राहा. "

पंतपधान नरेंद मोदी रविवार २६  डिसेंबर सकाळी ११ वाजता 'मन की बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८४ वा भाग असेल. २०२१ वर्षाचा हा शेवटचा भाग असणार आहे. २४ डिसेंबर दरम्यान ‘मन की बात ' कार्यक्रमासाठी नागरिक माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा  १८००११७८०० क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा