Wednesday, August 27, 2025

मन की बात साठी विचार पाठवीत राहा : पंतपधान नरेंद मोदी

मन की बात साठी विचार पाठवीत राहा : पंतपधान नरेंद मोदी

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या मन की बात संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " २६ डिसेंबर रोजी आयोजित आणि २०२१ वर्षाच्या अंतिम मन की बात साठी मला अनेक कल्पना आणि माहिती प्राप्त होते आहे. या सूचनांमध्ये विविध विषय आणि विविध क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडविण्यासाठी जे तळागाळात कार्यरत आहेत अशा अनेकांच्या कथांचा समावेश आहे. आपले विचार पाठवीत राहा. " पंतपधान नरेंद मोदी रविवार २६  डिसेंबर सकाळी ११ वाजता 'मन की बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८४ वा भाग असेल. २०२१ वर्षाचा हा शेवटचा भाग असणार आहे. २४ डिसेंबर दरम्यान ‘मन की बात ' कार्यक्रमासाठी नागरिक माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा  १८००११७८०० क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.

Comments
Add Comment