Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडामास्टर ब्लास्टरने केला वाहतूक पोलिसांना सलाम

मास्टर ब्लास्टरने केला वाहतूक पोलिसांना सलाम

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने वाहतूक पोलिसांचं मनापासून कौतुक केलं आहे.

सचिनने फेसबुकवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रीणीचा भीषण अपघात झाला. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. मात्र, त्यावेळी एका वाहतूक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच ती आता बरी आहे. अपघातानंतर त्याने ताबडतोब प्रसंगावधा दाखवत तिला ताबडतोब ऑटोमध्‍ये बसवत रुग्णालयात नेले. ज्यानंतर मी स्वत: जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांच्यासारखे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत, जे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करतात. अशा लोकांमुळेच जग सुंदर आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांना, विशेषत: जनतेची सेवा करणाऱ्यांना भेटता तेव्हा आवर्जून त्यांचे आभार मानायला थोडा वेळ द्या. आपल्याला कदाचित माहित नसेल, पण असे अनेकजण कोणताही गाजावाजा न करता आपली मदत करत असतात आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण भारतातील वाहतूक पोलिसांसाठी, लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण एकमेंकासाठी वाहतूक नियमांचा आदर करूया आणि शॉर्टकट नको वापरुया. कारण दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्वत:चा थोडा वेळ वाचवणे योग्य नाही. 

नेटकरांनी सचिनच्या या पोस्टच कौतुक करत त्यावर लाईक, शेअर आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -